BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नोकरी विषय-अधिक माहिती साठी क्लिक करा!
Posted on: 20-06-2016

बीएसएफमध्ये पॅरा मेडिकलच्या 19 जागा
बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (बीएसएफ) पॅरा मेडिकलच्या स्टाफ नर्स (03), फार्मासिस्ट गुणवत्ताधारक (15) मसालची(01) साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा किंवा 18 जूनचा मुंबई सकाळचा अंक पहावा.


बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा
बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (बीएसएफ) सहायक फौजदार (एएसआय)(152) आणि हेड कॉन्स्टेबल (एचसी) (470) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 16 जून ते 15 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in आणि http://bsf.nic.in/en/recruitment.html या वेबसाईटवर संपर्क साधावा.


सिडकोमध्ये विकास अधिकारी पदाच्या 25 जागा
सिडको या नगर नियोजन व पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील अग्रगण्य महामंडळामध्ये विकास अधिकारी (10) व सहायक विकास अधिकारी (15) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी 21 जून ते 5 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.cidco.maharashtra.gov.in ही वेबसाईट 21 जूनला उपलब्ध होणार आहे.


बृहन्मुंबई महापालिकेत कंत्राटी महिला आरोग्य स्वयंसेविकांच्या 322 जागा
बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी विभागाच्या आस्थापनेवर कंत्राटी महिला आरोग्य स्वयंसेविकांच्या 322 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि. 20, 21, 22, 23, 27 व 28 जून 2016 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत होणार आहे. याविषयीची जाहिरात दि. 15 जून 2016 च्या मुंबई लोकसत्ताच्या अंकात आली आहे.


राज्य आदिवासी विकास सहयोगी पदाच्या 18 जागा
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागात राज्य आदिवासी विकास सहयोगी या पदाच्या (18) जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा दि. 10 जुलै 2016 आहे. अधिक माहिती यशदा व आदिवासी विभागाच्या संकेतस्थळावर शिवाय http://www.geexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.


केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एन्फोर्समेंट ऑफिसर/अकाऊंट ऑफिसर पदाच्या २५७ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एन्फोर्समेंट ऑफिसर/अकाऊंट ऑफिसर पदाच्या २५७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०१६ आहे. अधिक माहिती http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक सचिव पदाची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगार्फत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये सहायक सचिव (राजपत्रित) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०१६ आहे. अधिक माहिती http://mahampsc.mahaonline.gov.in तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक पदाच्या दोन जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगार्फत प्राध्यापक - रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०१६ आहे. अधिक माहिती http://mahampsc.mahaonline.gov.in तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक-नॅफ्रॉलॉजी पदाच्या दोन जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगार्फत प्राध्यापक – नॅफ्रॉलॉजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-अ) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०१६ आहे. अधिक माहिती http://mahampsc.mahaonline.gov.in तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांच्या ९ जागा
पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील माहिती शिक्षण व संवाद आणि समानता तज्ञ (१ जागा), सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार (१ जागा), समाज शास्त्रज्ञ (१ जागा), मनुष्यबळ विकास सल्लागार (१ जागा), पाणी गुणवत्ता तज्ञ (१ जागा), वित्त नि संपादणूक अधिकारी (१ जागा), डेटा एन्ट्री ऑपरेटर (१ जागा), शिपाई (१ जागा), अभियांत्रिका तज्ञ (सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन / पाणी गुणवत्ता तज्ञ) (१ जागा) अशा एकूण ९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जून २०१६ आहे. अधिक माहितीसाठी दै.सकाळचा दि. ७ जून २०१६ रोजीचा अंक पहावा.


माझगाव डॉकमध्ये विशेष भरती मोहीम (१३ जागा)
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये चिफ मॅनेजर (३ जागा), मॅनेजर (१ जागा), डेप्युटी मॅनेजर (३ जागा), असिस्टंट मॅनेजर (२ जागा), सिनीअर इंजिनीअर (४ जागा) अशा एकूण १३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०१६ आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक