BREAKING NEWS
HEADLINE NEWS
पावसाळा विशेष शिवाजी महाराज आणि त्यांचा दृष्टिकोण काल,आज आणि उद्याची नितांत गरज
Posted on: 27-06-2016

गर्जा महाराष्ट्र ऑनलाइन मिडिया,मुंबई


 भूषण सोनार,लेखक -जळगाव (८७९३८१९३५०)


"व्यवस्थापन, सरंक्षण, स्वदेशाभिमान, स्वधर्माभिमान, परधर्मसाहिष्णु, परस्त्री सन्मान, पर्यावरण विषयक दृष्टिकोण असे अनेक पैलू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील पहीले जनकल्याणकारी राजे म्हणावे लागतील. अनुकूल परिस्थितीत आपल्या मुठभर मावळ्यासह महाराजांनी भल्या-भल्या सरदारांना सळो की पळो करुन सोडले.रयतेला गोर-गरीब जनतेला जुलमी,अत्याचारी सत्त्ताधार्यांपासून सरंक्षण करण्याची जिद्द आणि कला शिकवली स्वदेशाभिमान, स्वधर्माभिमान जागवून त्यांच्या मदतीने आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात पाच-पाच बादशाह्यांवर मात करून माँ साहेब जिजाऊ आणि शहाजी राजे यांचे स्वप्नपूर्ती करत स्वराज्य निर्मिति करून राज्यभिषेक करून घेतला. हिंदू जनते सोतबच मुस्लिमांनाही त्यांचा धर्म आचारणाचे स्वातंत्र देऊन आपल्या परधर्मसाहिष्णुपणाने सगळ्या जगाला आदर्श घालून दिला. आपल्या अल्प आयुष्यात ३६० किल्ले जिंकले आणि जवळपास १५ ते २० नवीन किल्ले बांधले या किल्ल्यांवर असलेली पाण्याची आणि अन्नाची कोठारे, सांडपाण्याचे नियोजन हां ३५० वर्षापूर्वीचा पर्यावरण विषयक महाराजांचा दृष्टिकोण बघुन त्यांच्या बद्दलच आदर आणखीणच वाढत जातो. तिन- चार महीने पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे गडावर वर्षभर नियोजन करण्यासाठी प्रत्येक गडावर तलाव, बारव, कुंड, टाके, हौद यांची बाँधनी केली. फ्रेंच प्रवासी ऐबे करे याने नद्यांचे पाणी आडवून त्या वर बंधारे बांधून महाराजांनी पाणी पुरवठा केल्याचा इतिहासात उल्लेख येतो. नदिवर, ओढ्यावर, विहरीतून येणाऱ्या पाण्यावर बंधारे बांधण्यासाठी महाराजांनी सवलती दिल्या. आपल्या कल्पक योजनांमधुन नैसर्गिक संसाधननांचा पुरेपूर योग्य वापर महाराजांनी केलेला दिसतो. वनसंसाधन, वनसंपदा महाराजांनी जपली, वाढवली वनअच्छानामुळे पर्जन्याचे प्रमाण वाढते. जंगलामुळे बाष्पिभवन न होता ते पाणी जमिनीत मूरतें किंवा साचुन राहते त्यामुळे जलसंवर्धन होते व जमिनीतिल पाण्याची पातळी वाढते हे पर्यावरण शास्र महाराजांनी३५० वर्षापुर्वी निर्माण केले अस म्हटल तर चुकीचे ठरणार नाही. आज आपण काय करत आहोत ? आधुनिक करणाच्या नावावर वृक्षतोड़ चालवली आहे.  कुपनलीके द्वारे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर करून जमिनीतील भूजल पातळीचा ह्रास चालवला आहे. महाराजांचा पर्यावरण विषयक दृष्टिकोण येणाऱ्या काळात आपण अमलात आणला नाही तर भयंकर दुष्काळाला आपल्याला तोड़ द्यावे लागेल. या सगळ्या पासून वाचायचे असेल तर ३५० वर्षा पूर्वी महाराजांनी केलेल्या उपाय योजनाच आपल्या राबवाव्या लागतील. १) नियोजन बद्ध पाण्याचा वापर करने. २) छतावरील पावसाच्या पाण्याने कुपनलिकांचे पुनर्भरण करणे. ३) नियोजन बद्ध विहीर पुनर्भरण कार्यक्रम आखणे. ४) वाहत्या पाण्यावर बंधारे उभारणे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक