BREAKING NEWS
HEADLINE NEWS
शाहरूख व अक्षय सर्वाधिक मानधन घेणारे स्टार
Posted on: 13-07-2016

न्यूयॉर्क- बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान व खिलाडी अक्षय कुमार हे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या जगातील 100 सेलिब्रिटींची 2016 मधील यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. त्याच अमेरिकेचा प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट हिने या पहिले स्थान पटकाविले आहे. तिची कमाई 17 कोटी डॉलर आहे.

शाहरुख खान तीन कोटी 30 लाख डॉलर मानधनासह यादीत 86 व्या स्थानावर आहे, तर अक्षय कुमार तीन कोटी 15 लाख डॉलरसह 94 व्या क्रमांकावर आहे. चित्रपटाशिवाय अनेक कंपन्यांच्या जाहिराती तो करीत असून, त्यातील अनेक अमेरिकन ब्रॅंड आहेत. शाहरूख ने गेल्या काही वर्षात अनेक हिट चि‍त्रपट दिले असून बॉक्स ऑफिसवर अजूनही त्याची चलती असल्याचे दिसते, असे फोर्ब्सने म्हटले आहे. शाहरूख एका चित्रपटासाठी लाखो डॉलर कमावित असून चित्रपटातील भूमिकेसाठी तो कष्टही घेतो, अशा शब्दात त्याचे ौतुक केले आहे. चित्रपटाशिवाय अनेक कंपन्यांच्या जाहिराती तो करीत असून त्यातील अनेक अमेरिकन ब्रँड आहेत, यातून शाहरुखची मोठी कमाई होते, असेही म्हटले आहे.अक्षयकुमारच्या क्रमांकात यावर्षी घसरण झाली आहे. 2015 मधील यादीत तो 76 व्या स्थानावर होता.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक