BREAKING NEWS
HEADLINE NEWS
'स्वरचक्र' ॲपच्या निर्मात्यांचा विनोद तावडे यांच्या हस्ते गौरव
Posted on: 14-07-2016

मुंबई, दि. 14 : चलभाषावरील (मोबाईल) मराठी देवनागरी टंकलेखनासाठी (टायपिंग) उपयुक्त असलेल्या 'स्वरचक्र' या ॲपच्या निर्मात्यांचा, 10 लाख डाऊनलोड्स पूर्ण झाल्याबद्दल आज मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी गौरव केला.

‘स्वरचक्र’ हे आयआयटी मुंबई येथील मराठी भाषाप्रेमी असलेल्या प्राध्यापक व संशोधकांच्या गटाने स्वयंप्रेरणेने निर्माण केलेले वैशिष्ट्यपूर्ण ॲप आहे. भाषाविज्ञान, लिपिशास्त्र आणि वापरयोग्यता याबाबतीत उत्कृष्ट असलेले हे ॲप सर्वसामान्य मोबाईलधारकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. या निर्मात्यांनी साधारणत: तीन वर्षापूर्वी कोणतीही आर्थिक मदत न घेता ‘स्वरचक्र’चे निर्माण केले. या ॲपची उपयोगिता पाहता व्याकरणाच्या दृष्टीने ते अत्यंत सुलभपणे वापरता येते. सद्यस्थितीत दहा भारतीय भाषांमध्ये  स्वरचक्र कार्यरत आहे.

            मराठीचा नव तंत्रज्ञानातील वापर वाढवणे हा मराठी भाषेच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे. यासाठी अशा अभिनव निर्मितीची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन श्री. तावडे यांनी स्वरचक्र निर्मात्यांचा गौरव करताना केले. डॉ. अनिरुद्ध जोशी, डॉ. गिरीश दळवी, श्रीमती मंजिरी जोशी आणि शशांक आहिरे यांचा श्री. तावडे यांनी ग्रंथभेट देऊन गौरव केला. राज्यातील अधिकाधिक नागरिकांनी स्वरचक्र किंवा त्यासारखी सुयोग्य ॲप्स डाऊनलोड करून मराठी देवनागरी लिपीत आवर्जून टंकलेखन करावे आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्यासह मराठी भाषेचा विकासही साधावा, असे आवाहन याप्रसंगी मराठी भाषा मंत्री श्री. तावडे यांनी केले.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक