BREAKING NEWS
HEADLINE NEWS
सामाजिक सलोख्यासाठी गणेशोत्सव अभियान राबवावे- पालकमंत्री
Posted on: 20-08-2016

गर्जा महाराष्ट्र ऑनलाइन मीडिया,मुंबई | प्रतिनिधी:मुंबई


अमरावती: लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतुन यावर्षी लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्यात येणार आहे. सामाजिक सलोख्यासाठी प्रशासनाने गणेशोत्सव अभियान राबवावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.

          व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे वित्त मंत्र्यांनी याबाबत चर्चा केली. त्यानुसार काल (19 ऑगस्ट) रोजी संगीतसुर्य केशवराव भोसले सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकानदार, पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम उपस्थित होते.

          यावेळी लोकमान्य महोत्सव समिती सदस्य संजय फांजे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन केले. प्रत्येक तालुक्यातुन सार्वजनिक गणेश मंडळांनी या अभियानात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

          टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवात राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवावे, पर्यावरण पुरक गणेशोत्सव असावा अशा सुचनाही पालकमंत्री यांनी दिल्या.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक