BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये महाराष्ट्राचा सकारात्मक पुढाकार -मुख्यमंत्री
Posted on: 22-08-2016

              नागपूर : वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाला पायबंद घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या नॅशनल कॅन्सर ग्रीडमध्ये महाराष्ट्र राज्य सक्रिय पुढाकार घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

            राष्ट्रीय थायरॉईड कॅन्सर व्यवस्थापन परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हॉटेल प्राईड वर्धा रोड,नागपूर येथे थायराईड सोसायटी नागपूर आणि विदर्भ व सोसायटी ऑफ हेड अँड नेक ऑनकॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अधिवेशनास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. मदन कापरे, सचिव डॉ.देवेन माहोरे, डॉ. आर. रवी, डॉ.प्रथमेश पै प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीप प्रज्वलन करुन पहिल्या राष्ट्रीय थायरॉईड कॅन्सर परिषदेचे उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक स्तरावर कर्करोगाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

            थायरॉईड कॅन्सरच्या रुग्णात मोठी वाढ होतांना दिसत असून याबाबत जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. ही परिषद यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. थायारॉईड कॅन्सर विशेषज्ञ डॉक्टरांनी मिळून स्थापन केलेल्या या परिषदेमुळे सामान्य माणसाला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे सोईचे होईल. राज्याने अवयव दान रजिस्ट्रेशन मोहीम हाती घेतली असून याचा फायदा गरजू व गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक