BREAKING NEWS
HEADLINE NEWS
पोलीस आपले 'रक्षक आहेत भक्षक' नाही पोलीस सुरक्षित तर जनता सुरक्षित!
Posted on: 09-09-2016
●राहुल महाजन,गर्जा महाराष्ट्र ऑनलाइन मिडिया, मुंबई 【9860632676. मुंबई नंतर कल्याण,नंदुरबार अश्या अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ला अशी बातमी येतेय. हल्ला का झाला हे मला माहिती नाही, परंतु ह्या क्रूर हल्लेखोरांना मी एकाच सांगू इच्छितो तुमच्या घरात जर कोणी मोठे असेल तर तो आपला बाप असतो आणि बापाला हात लावण्याची हिम्मत तुम्ही केली यापेक्षा निंदनीय गोष्ट कोणती नाही, अहो आपल्या देशाचे संरक्षण पोलीस करतात म्हणूनच आपण सुरक्षित आहेत. चोरी झाली कि पोलीस, दंगल झाली कि पोलीस,सामाजिक कार्यक्रम तिथे पोलीस,राजकीय बंदोबस्त तिथे पोलीस अहो आपले शेजारच्या माणसासोबत जरी भांडण झाले तरी पोलीस मग का पोलिसांवर हल्ले तुमची पोलिसांबद्दल तक्रार असेल तर त्यासाठी तुमच्या कडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पोलीस आपले 'रक्षक आहेत भक्षक' नाही, 24 तास ड्युटी करूनही तो सुखी नाही जनतेच्या सुखासाठी तो आपली दिवाळी,दसरा, होळी,दहीहंडी,गणपती असे किती सणाचे आनंद तुमच्या आनंदमध्ये आपला आनंद ड्युटवरच साजरा करतो, असे सर्वाना वाटते कि पोलीस सर्वात सुखी आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो स्वतःचे सुख गहाण ठेवून काम करणारा एकमेव व्यक्ती जो कोणी असेल तर तो फक्त माझा पोलीस होय! आपल्या देश हा डॉ.बाबासाहेबांच्या संविधानावर व कायद्यावर चालतो कुणाच्या दादागिरीवर चालत नाही, आपल्या देशाचे नेतृत्व करणारे आदरणीय व्यक्तिमत्व पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना ह्या बातमी द्वारे विनंती करू इच्छितो कि, पोलिसांचे संरक्षण झाले तरच देशाचे संरक्षण होईल दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे! आणि ती करण्याची गरज आली आहे, मित्रांनो जर पोलिसांवरच जर हल्ले होतील तर जनता सुरक्षित राहणार नाही, गुडगिरी,दादागिरी,अन्याय, अत्याचार वाढेल ज्याच्याकडे जास्त पैसा तोच आपल्यावर हुकूम करेल असे होऊ नये म्हणून जनतेच्या सेवेसाठी पोलीस आहेत हल्लेखोरांनो आधी तुमचा विचार करा मग नंतर पोलिसांचा! अहो नका करु हो हल्ले ह्या वर्दीतल्या माणसावर तो पण एक माणूसच आहे. 3 दिवसापुवी ठाण्याच्या तीनहात नाक्यावर ट्राफिक पोलिसाला उडविण्याचा प्रयत्न केला, परवा कल्याणमध्ये चक्क पोलिसाला पाण्यात बुडविण्याचा प्रयत्न केला, काल नंदुरबार मध्ये हि तर आताची चित्र आहेत या आधीही पोलिसांवर हल्ले,अन्याय,अत्याचार झाले ते त्यांनी सहन केले हे जनतेने व लोकप्रतिनिधी यांनी विसरू नये, काही ठिकाणी पोलिसांवर राजकीय दाबावतंत्र हि वापरले जाते हि शोकांतिका आहे, शेवटी पोलिसांना कायद्याच्या चौकटीतच राहून काम करावे लागते. पण या क्रूर जातीच्या हल्ला करणाऱ्या लोकांना मी सांगू इच्चीतो "बापाचा बाप" फक्त पोलीस आहे हे विसरू नका! पोलिसांना सहकार्य करा एक माध्यम प्रतिनिधी म्हणून आपणास विनंती आहे। ✍
Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक