BREAKING NEWS
HEADLINE NEWS
केदार एवढा चांगला खेळेल याचा आम्ही विचार केला नव्हता-मॉर्गन
Posted on: 17-01-2017

पुणे :

केदार जाधवच्या दमदार खेळीवर इयॉन मॉर्गने आपले मत मांडले आहे. इंग्लंडने टीम इंडियाला दबावातून बाहेर निघण्याची संधी दिलीच, शिवाय केदार जाधवच्या दमदार खेळीने सर्व डावपेच धुळीस मिळवले, असं इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने म्हटलं आहे.

केदार जाधवने 76 चेंडूंचा सामना करत शानदार 120 धावा ठोकल्या. त्याने इंग्लंडने दिलेल्या 351 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीसोबत 200 धावांची भागीदारी रचत इंग्लंडचा विजय हिसकावला. भारताच्या 63 धावांवर 4 विकेट होत्या, पण केदारने मैदानात येताच फटकेबाजी सुरु केली. तो एवढा चांगला खेळेल याचा आम्ही विचारही केला नव्हता. कारण त्याच्यावर इंग्लंड संघाने पूर्ण होमवर्क केला होता. त्याच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील फलंदाजीचे व्हिडिओ पाहिले होते. तरीही सर्व योजना निकामी ठरल्या, असं मॉर्गन म्हणाला.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक