BREAKING NEWS
HEADLINE NEWS
सुवर्णसंधी-एसटी महामंडळात 14247 पदांसाठी भरती
Posted on: 17-01-2017

मुंबई


बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत बेरोजगार असणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने गुड न्युज दिली आहे.

कोकणात चालक आणि वाहकांची कमतरता अधिक आहे. त्यामुळे ही पदं तातडीने भरण्याच्या सूचना दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या सहा विभागांमध्ये 7923 चालक आणि वाहकांची भरती करण्यात येणार आहे.तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी 2548 लिपीक, 3293 सहाय्यक आणि 483 पर्यवेक्षकांची भरती लवकरच करण्यात येईल.


या भरतीची सविस्तर जाहिरात 7 जानेवारीपासून एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in Am{U www.msrtcexam.i या वेबसाईटवर उपलब्ध झाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरु झाली असुन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी असेल. महत्त्वाचं म्हणजे अर्ज भरताना अनावधानाने चुकीची किंवा राहून गेलीली माहिती दुरुस्त करण्यासाठी किंवा भरण्यासाठी महामंडळाने 6 ते 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक