BREAKING NEWS
HEADLINE NEWS
बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांची महाराष्ट्र विधीमंडळास भेट
Posted on: 18-01-2017

मुंबई, 

बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी आज महाराष्ट्र विधीमंडळास भेट देऊन विधीमंडळाच्या ऑनलाईन कामकाजाची माहिती घेतली व डिजिटायझेशन प्रकल्पाविषयी जाणून घेतले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचे स्वागत करून या प्रकल्पांची माहिती दिली.         

बिहार विधानसभेचे अध्यक्ष श्री. चौधरी हे विधीमंडळाच्या ऑनलाईन कामकाजाची माहिती घेण्यासाठी आज विधानभवनात आले होते. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. बागडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, महेंद्र काज, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे कार्यकारी संचालक विवेक सावंत, वरिष्ठ महाव्यवस्थापक समीर पांडे यांच्यासह विधीमंडळातील विविध अधिकारी उपस्थित होते.  

 महाराष्ट्र विधीमंडळाचे कामकाज हे संपूर्ण ऑनलाईन करण्याच्या दिशेने पूर्ण होत आले असल्याचे श्री. बागडे यांनी यावेळी सांगितले. अधिवेशन काळात प्रश्न, लक्षवेधी, इतर कामकाजाची माहिती विधीमंडळ सदस्यांकडून ऑनलाईन मागविण्यात येते. तसेच सदस्यांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरेही विभागांकडून ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 श्री. चौधरी म्हणाले की, बिहार विधीमंडळातही ऑनलाईन कामकाज सुरूवात करण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठीच महाराष्ट्र विधीमंडळाने राबविलेला प्रकल्पाची माहिती घेतली आहे. तसेच बिहार विधीमंडळाच्या ग्रंथालयात अनेक महत्त्वाचे व दुर्मिळ दस्तावेज आहेत. त्यांचेही डिजिटायझेशनचे काम सुरू आहे. ऑनलाईन कामकाजासाठी महाराष्ट्राने राबविलेल्या प्रकल्प मार्गदर्शक ठरणार आहे.श्री. सावंत यांनी महाराष्ट्र विधीमंडळात राबविलेल्या ऑनलाईन कामकाज पद्धतीचे सादरीकरण केले.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक