BREAKING NEWS
HEADLINE NEWS
जिओ ग्राहकांना मार्चनंतर सुखद धक्का मिळणार?
Posted on: 18-01-2017

मुंबई : 

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी आणलेल्या निरनिराळ्या ऑफर आणि सामान्य लोकांना याचा उपभोग घेता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पुन्हा एकदा रिलायन्स जिओ ग्राहकांना सुखद धक्का देणार का हाच प्रश्न पडला आहे.

रिलायन्स जिओशी चार महिन्यात 7 कोटी 24 लाख ग्राहक जोडले गेले आहेत. वेलकम ऑफरनंतर प्रतिदिन 6 लाख ग्राहक जोडल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा आकडा मार्चपर्यंत 10 कोटींच्या पुढे जाऊ शकतो, असंही कंपनीने म्हटलं आहे.

मार्च 2017 पर्यंत मोफत सेवा दिल्यानंतर ग्राहकांना पेड सेवा कधीपासून मिळेल, यावर कंपनीने अद्यापही मौन बाळगलेलं आहे. त्यामुळे रिलायन्सकडून मार्चनंतरही मोफत डेटा आणि कॉलिंग सेवा मोफत दिली जाऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. रिलायन्सला रोज लाखो ग्राहक मिळत असून 31 डिसेंबरपर्यंतच ग्राहकांची संख्या 7 कोटी 24 लाख एवढी झाली आहे, असं रिलायन्स जिओचे रणनितीकार आणि योजना प्रमुख अंशुमान ठाकूर यांनी सांगितलं. मात्र त्यांनी मोफत सेवा वाढवणार का, या प्रश्नावर मौन बाळगलं.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक