BREAKING NEWS
HEADLINE NEWS
वेडात मराठे विर दौडले सात...
Posted on: 21-01-2017

मुंबई,

      छत्रपती शिवाजी महाराज बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले. दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला.आणि दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित शिव छत्रपती या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर लाँच झाला होता. या सिनेमात उदय सोनवणे, सचिन राऊत, पंकज देशमुख, श्वेता काळे, सिध्दार्थ शिळीमकर, अभिजीत कदम, अबोली साठे, तेजस्विनी एडके, निखील मराठे, सोमेश्वर काळजे यांच्या भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन साहस बर्फे यांनी केलंय. महाराजांनच्या जन्मा पासून ते स्वर्गवासी होण्या पर्यंतचा प्रवास आपणाला पहावयास मिळेल.

चला तर मग पाहूयात हा सिनेमा !  

https://www.youtube.com/watch?v=0OWZwIjJ65Q

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक