BREAKING NEWS
HEADLINE NEWS
बॉक्स ऑफिसवर हृतिक सोबत शाहरुखचा अतितटीचा सामना
Posted on: 27-01-2017

मुंबई,

बॉक्स ऑफिसवर दोन सर्वांच्या चाहत्या दोन सुपरस्टारची टक्कर पाहायला मिळत आहे. किंग खान शाहरुखचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ हे दोन चित्रपट अतितटीचा सामना करत आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता ‘रईस’च रईस ठरत आहे. राहुल ढोलकियाचं दिग्दर्शन असलेला हा रईस क्राईम थ्रिलर आहे.

शाहरुख खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रईसने दोन दिवसात मिळून 46.72 कोटींचा गल्ला जमवला आहे.ही माहिती चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ही दिली आहे. रईसने पहिल्या दिवशी बुधवार 25 जानेवारी 20.42 कोटी, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी गुरुवार 26.30 कोटींची कमाई केली.

यामी गौतम आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘काबिल’ सिनेमाने पहिल्या दिवशी 10.43 कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी 18.67 कोटी कमवले. म्हणजेच दोन दिवसांची ‘काबिल’ची एकूण कमाई 29.10 कोटी झाली आहे. संजय गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेला आणि राकेश रोशन यांची निर्मिती असलेला ‘काबिल’ अगदीच ‘रईस’ सोबत रेसमध्ये पळण्यास सज्ज आहे.  

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक