BREAKING NEWS
HEADLINE NEWS
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे जवानांच्या मृत्यू आखडेवारीत वाढ
Posted on: 27-01-2017

श्रीनगर,

जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये या मोसमातील ही चौथी हिमवृष्टी आहे. काश्मीरमध्ये कालपासून सुरु झालेल्या हिमवृष्टीमुळे प्रशासनानं उंच ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना हिमस्खलनाचा इशारा दिला होता. बर्फाची कडा कोसळल्याने काही जवान बर्फाखाली दबले असून त्यांचा शोध घेतला जात होता. आतापर्यंत एका अधिकाऱ्यासह सात जवानांची सुटका करण्यात आली आहे. हे जवान सीमेवर गस्त घालत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


काश्मीरमधल्या गुरेझ सेक्टर भागात झालेल्या हिमस्खलनाच्या घटनेत शहीद झालेल्या जवानांची संख्या 14 वर पोहोचली आहे. बुधवारी दोन छावण्यांमधले 10 जवान शहीद झाल्याची माहिती होती. शुक्रावीर आणखी 4 जवानांचे मृतदेह सापडले. हिमस्खलनामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला असल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरेझ सेक्टरमध्ये 15 दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. यामुळे संपुर्ण गुरेझ हिमवादळाच्या तडाख्यात सापडले.राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी गुरेझ सेक्टरमधील प्रभावित नागरिकांना शक्य ती मदत पोहोचवण्याचे आदेश दिले.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक