BREAKING NEWS
HEADLINE NEWS
आजचे भविष्य
Posted on: 30-01-2017

मेष

व्यवहारात सावध पवित्रा घ्या. तरच आपल्या प्रगतीस चालना देणे शक्य होईल. आपल्या आक्रमक कार्यप्रणालीने व्यवसायातील योजना यशस्वी कराल. आरोग्यातील सुधार नवा उत्साह प्रदान करेल.

वृषभ

सहकारीवर्गाशी सलोंखा प्रस्थापित करा. शब्द हे दुधारी अस्त्र हे आपण जाणताच , त्याना जपून वापरा. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.

मिथुन

व्यवसायातील देण्याघेण्याच्या व्यवहारात लाभ होईल. आपल्या सहकार्यांचे पाठबळ मिळेल. प्रियव्यक्तीचे मन जपण्याचा प्रयत्न केल्यास समाधानाचे वातावरण अनुभवाल.

कर्क

वहारात आर्थिक गुंता होण्याचा संभव आहे. नोकरीव्यवसायात दिलेले शब्द पाळा. कौटुंबिक निर्णय सर्वांच्या सहमतीने घ्या.

सिंह

 नव्या व्यावसायिक संधी आव्हान देतील. लाभाचे प्रमाण सुधारण्यासाठी प्रयत्न करा. कामातील जबाबदारी पेलण्यासाठी नियोजनास प्राधान्य द्या.

कन्या

 नोकरीव्यवसायात तारतम्याने पैसा खर्च करा. प्रियव्यक्तीचे मन राखा. आहारविहाराचा विचार करुन दिनचर्या ठरवा. मन प्रसन्न ठेऊन कामाचा व्याप हाताळा.

तुळ

व्यवसायात मित्रवर्गाचा सल्ला उपयुक्त हितकारक ठरेल. वरिष्टांशी संबंध सुधारतील. मुलांच्या मनातील कल्पनेस वाव द्या. जोडीदारास विश्वासात घेऊन खर्चाचा तपशील ठरवा.

वृश्चिक

आपली पैशाची बाजु बळकट होण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या. नव्या ओळखी बुद्धिस चालना देतील . मुलांचे सौख्य आनंदवर्धक ठरेल.

धनु

आपली पैशाची बाजु बळकट होण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या. नव्या ओळखी बुद्धिस चालना देतील मुलांचे सौख्य आनंदवर्धक ठरेल.

मकर

व्यावसायिकांना आर्थिक चिंता सतावेल. अथक परिश्रमास सिद्ध व्हा हा ग्रहसंकेत आहे. वैवाहिक जीवनातील गैरसमज वातावरण गडूळ करेल सावध रहा.

कुंभ

भागिदारांची साथ लाभल्याने लाभाचे प्रमाण सुधारेल. विजयाची घोडदोड सुरू राहील. मुलांना विश्वासात घेऊन नवी खरेदि करा. कौटुंबिक सलोखा जपणे शक्य होईल.

मीन

नोकरीधंद्यातील आर्थिक प्रगतीस नवी संधी मिळेल. मनातल उत्साहि विचारांचे झरे प्रवाहित होतील. विरोधकांवर अंकुश ठेवण्याची योजना फत्ते होईल.

 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक