BREAKING NEWS
HEADLINE NEWS
कोबी मुठिया
Posted on: 30-01-2017

साहीत्य

 1.    १ कप किसलेला कोबी
 2.    १ कप ज्वारीचे पीठ
 3.    ५ टे. स्पू. लो फॅट दही
 4.    १ टे. स्पू. कोथिंबीर
 5.    १ टी. स्पू. मिरची-आले पेस्ट
 6.    १ टी. स्पू. लसूण पेस्ट
 7.    १ टी. स्पू. तेल
 8.    चिमूटभर सोडा
 9.    मीठ
 10.    साखर
 11.    हळद
 12.    लिंबूरस
 13.    हिंग
 14.    जीरे
 15.    कढीपत्ता

 

कृती

प्रथम एका भांड्यात किसलेला कोबी ज्वारीचे पीठ दही मिरची-आले पेस्ट स्पू. लसूण पेस्ट चिमूटभर सोडा मीठ साखर हळद लिंबूरस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. ईडली पात्रात पाणी गरम करून तयार मिश्रणाचे रोल करून वाफवून घ्यावे. त्यानंनतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावे. व त्यात तयार मुठीयाचे तुकडे करुन वरुन कोथिंबीर पेरुन गरमा गरम खायला द्यावे.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक