BREAKING NEWS
HEADLINE NEWS
मशरूम पुलाव
Posted on: 31-01-2017

साहीत्य

  २ वाटी तांदूळ

  १ डबा मशरूम

  २५० ग्रॅम पनीर

  ३ कांदे

  २ ढोबळी मिरची

  २ गाजर

  १ लहान चमचा मीठ

  १/२ लहान चमचा गरम मसाला

  ५ चमचे तूप

 

कृती

तांदूळ धुऊन स्वच्छ करून तासभर भिजवा.

मशरूम धुऊन बारीक व लांब चिरुन घ्या. पनीर चौकोनी चिरुन तळून घ्या.

कांदा, ढोबळी मिरची, गाज्रर बारीक व लांब चिरुन घ्या.

एका पातेल्यात तूप गरम करा. कांदा टाकून परता.

कांदा गुलाबीसर झाल्यावर गरम मसाला, मीठ व मशरूम टाकून शिजवा. आता ढोबळी मिरची, गाजर व पनीर टाका.

तांदूळ टाकून ४ वाटी पाणी टाका व गॅस कमी करुन झाकून शिजवा. शिजल्यावर गरम-गरम सर्व करा.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक