BREAKING NEWS
HEADLINE NEWS
लांबसडक काळ्या घनदाट केसांनसाठी
Posted on: 01-02-2017

केस हा आपल्या सर्वांसाठी खूपच जिव्हाळ्याचा विषय असतो. लांबसडक काऴे घनदाट केस हे स्त्रीयांसोबत पुरुषांनाही आकर्षित करतात. पण आजकाल केस पिकणे, गऴणे केस दुभंगणे, कोंडा होणे अशा अनेक समस्यांना अनेकांना सामोरे

जावे लागते. अनेकजण आपल्या या समस्या सोडवण्यासाठी अनेक महागड्या ट्रिटमेंट्स करतात.

आज आम्ही तुम्हांला असे काही सोप्पे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे  घरबसल्या तुम्ही केसांच्या समस्या सोडवू शकतो.

आवळा- आवळ्यामध्ये व्हीटॅमीन सी मोठ्या प्रमाणात असते आणि व्हीटॅमीन सी आपल्या केसांसाठी अतिशय़ महत्वाचा घटक आहे. आवळ्याचा उपयोग आपल्या आहारात करावा. आवळ्याचे लोणचे, रस किंवा आवळ्याचा मुखवास

आवळ्याचा विविध व्यंजनांचा समावेश आपल्या आहारात करावा. किंवा आवळा खोबरेल तेलामध्ये काही दिवस ठेऊन ते तेल लावणेही फायद्याचे ठरते.

कांदा- कांद्याचा उपयोग आपल्या आहारामध्ये नेहमीच होतो. परंतू कांदा केसांच्या वाढीसाठी, केसांतील कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 2 ते 3 कांद्यांचा रस काढावा, आणि तो रस केसांच्या मुळाशी  लावावा 10-15 तसाच ठेऊन

सौम्य शांपूने केस धुवावेत यामुळे केस केसातील कोंडा कमी होऊन केसांची वाढ योग्य प्रकारे होते.

तीळाचे तेल- आपण सगळेच आपल्या केसांना नारळाचे तेल लावतो परंतू तीळाचे तेलही अतिशय़ गुणकारी आहे. पांढऱ्या केसांसाठी तीळाचे तेल हा उत्तम पर्याय आहे.

कडूलिंबाची पाने - केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कडूलिंबाची पाने हा देखील चांगला उपाय आहे. कडूलिंबाच्या पानांची पेस्ट करुन ती केसांच्या मुळांना लावावी त्यानंतर सौम्य शांपूने केस धुऊन टाकावेत, कोंडा निघून जातो.

चहाची पाने- रोजच्या वापरातला चहा केसांसाठी उपयुक्त असतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे चहाच्या पानांचा पेस्ट करुन ती पाण्यामध्ये 15 मिनीटे उकळवावीत आणि ते पाणी केसांना लावावे यामुळे केस काळे

राखण्यास मदत होते.

संत्री - संत्र्याचा रस केसांना लाऊन तो रस काही वेळ ठेवावा आणि केस धुवावेत यामुळे केस मुळापासून मजबूत आणि मऊ होतात. संत्र्यामध्ये व्हीटॅमीन सी असते हा केसांसाठी फारच उपयुक्त आहे.

याशिवाय कडीपत्ता, सीताफळाची पाने ह्यांचा उपयोग केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. अशा वेगवेगळ्या उपचारांद्वारे  केसांची काळजी आपण घरच्या-घरी योग्य प्रकारे घेऊ शकतो.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक