BREAKING NEWS
HEADLINE NEWS
अर्थसंकल्पामधुन शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
Posted on: 01-02-2017

नवी दिल्ली :

प्रथमच नोटबंदीनंतर अर्थसंकल्प मांडण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केलेल्या दिसुन येत आहे. ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकी  आधी हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.

अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे. छोट्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १९०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये राज्यांची देखील मदत असणार आहे.मागील बजेटमध्ये ५५०० कोटीच्या तुलनेत यंदा १३००० कोटी रुपये शेतकरी वीमा योजनेसाठी देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हितात मातीच्या परीक्षणासाठी १०० हून अधिक लॅब तयार केले जाणार आहेत.पिक विमाचं कव्हरेज ५० टक्क्यापर्यंत वाढवला. कृषी क्षेत्रात 4.1 टक्के वृद्धी दर दिसली. फार्म क्रेडिटसाठी १० लाख कोटींचं लक्ष्य बजेटमध्ये करण्यात आलं आहे. तसेच पीक विमा आता ३० टक्क्यांऐवजी ४० टक्के असणार आहे.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक