BREAKING NEWS
HEADLINE NEWS
वायफाय नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी
Posted on: 02-02-2017

वायफाय हे तंत्रज्ञान आता सगळ्यांनाच परिचयाचे झाले आहे. घरातील सगळ्यांनीच डेटा पॅकचा रिचार्ज न करता इंटरनेटचा वापर करता यावा यासाठी घरातील इंटरनेट जोडणीला वायफाय राऊटर लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण या वायफाय नेटवर्कची सुरक्षाही तितकीच गरजेची आहे. फक्त एकच व्यक्ती नाही तर अनेक जण याने जोडलेले असतात म्हणूनच तुमचे वाय फाय नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी जरूर करा.

नवीन तंत्रज्ञानावर आधारित सर्वच राऊटर आपल्याला उच्च दर्जाची सुरक्षा पुरवितात. यामध्ये आपण खरेदी करत असलेले राऊटर ‘डब्लूपीए २’ आधारित आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे.
* राऊटर सेटिंगवर जाऊन डिफॉल्ट यूजर नेम आणि पासवर्ड पहिल्यांदा बदलून घ्या. वाय फाय सर्व्हिस मॅन्यूएलमधून याबाबतीत तुम्हाला मार्गदर्शन केले असते ते पाहून या सेटिंगमध्ये तुम्ही बदल करू शकता.
* शेजारी पाजारी किंवा मित्र मैत्रिणींना वायफायचा एक्सेस देऊ नका. जास्तीत जास्त युजर्स वायफाय वापरत असले की वेग कमी होतो. पण याचबरोबर तुमचा कम्प्युटर हॅक होण्याची शक्यता असते.
* शक्य असल्या व्हायरलेस सिग्लनची रेंज ही हाय असेल तर ती कमी ठेवा म्हणजे हि सिग्लन यंत्रणा फक्त तुमच्या घरापुरता मर्यादित ठेवा.
* व्हायरलेस नेटवर्क नेम म्हणजे एसएसआयडी चे नाव बदला. हे नाव ठेवताना तुमचे नाव, घराचा किंवा बिल्डिंगचा पत्ता आणि वाढदिवसांची तारिख वगैरे एसएसआयडी ठेवणे टाळा.
* काहींच्या घरी चोवीस तास वायफाय सुरु असते. पण शक्य असेल तर वाय फाय बंद ठेवा.
* वायफायच्या सिक्युरिटीसाठी व्हर्चुअल प्राइवेट नेटवर्कचा वापर करा. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही तुमचे वायफाय नेटवर्क सुरक्षित ठेवू शकता.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक