BREAKING NEWS
HEADLINE NEWS
GMAIL होणार बंद, गुगलने घेतला निर्णय
Posted on: 03-02-2017

मुंबई

टेक्नॉलॉजिच्या जमान्यात सर्वच लोक ही ऑनलाईन सेवांचा जास्तीत जास्त वापर करताना दिसतात. मात्र गुगलने क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर Gmail सपोर्ट बंद होणार असल्याची घोषणा केली.

Windows XP आणि Windows Vista  या ऑपरेटिंग सिस्टिमवर Gmail वापरणा-यांवर याचा परिणाम होईल असंही गुगलने स्पष्ट केलं. या वर्षाअखेरपर्यंत Gmail सपोर्ट सुरू असेल मात्र, त्यानंतर बंद होईल अशी घोषणा गुगलने बुधवारी केली.  क्रोम व्हर्जन 53 किंवा त्याहून जुनं व्हर्जनचं ब्राऊझर वापरणा-यांना 8 फेब्रुवारी 2017 पासून बॅनर नोटीफीकेशन दिसेल असं गुगलने सांगितलं. 

जुन्या ओएस किंवा ब्राऊझरमध्ये सिक्युरिटी अपडेट मिळत नाही त्यामुळे त्यांना हॅक करणं सोप्पं असतं म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यतः युजर्स ब्राऊझर्स अपडेट करतात त्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम   Windows XP आणि Windows Vista या ऑपरेटिंग सिस्टिमवर Gmail वापरणा-यांवर होणार आहे. 

जुन्या क्रोम व्हर्जनवर  Gmail  वापरलं तर हॅकिंगचा धोका वाढेल म्हणून ब्राऊझर अपडेट करण्यास आणि नव्या ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्याचं गुगलकडून आवाहन करण्यात आलं आहे.   

 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक