BREAKING NEWS
HEADLINE NEWS
हिमस्खलनात गाव उद्धवस्त, अनेक बेपत्ता,व मृतांच्या आखडेवारीत वाढ
Posted on: 06-02-2017

इस्लामाबाद,

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या हिमवृष्टी आणि हिमस्खलनामुळे 115 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानात शेरशाल हे गाव पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे.त्याचप्रमाणे गावातील 100 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानात मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. त्याच 6 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानचे आपातकालिन व्यवस्थापनाचे प्रवक्ते ओमर मोहम्मदी यांनी सांगितले की,  देशातील 34 पैकी 22 राज्यांना हिमवृष्टीसोबत हिमस्खलनाचा फटका बसला आहे. 

मागील 4 दिवसांत हिमवृष्टी आणि हिमस्खलनामुळे अनेक घरे जमिनदोस्त झाले आहेत. अनेक राज्यात वाहतूक ठप्प झाली आहे.
नूरिस्तान राज्यातील बरगामताल जिल्ह्यात एक गाव पूर्णपणे उद्धवस्त झाले असून 50 जणांचा मृत्यू झाला आहे. 
परवानचे राज्यपाल मोहम्मद असीम यांनी सांगितले की, राज्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. 
देशात 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक