BREAKING NEWS
HEADLINE NEWS
कुशल टंडनच्या समयसुचकतेमुळे जेनिफर विंगेटचा वाचला जीव
Posted on: 08-02-2017

मुंबई

एंटरटेन्टमेंटच्या जगात आपल्या कलेतुन सादरीकरणातुन प्रेक्षकांना खुष करण्यासाठी आणि आपल्याकडे वळुन घेण्यासाठी नवनवीन प्रकारचे स्टंट टेलिव्हिजन मध्ये केले जाते. त्यामुळे हल्ली च्या मालीकांमध्ये ही वास्तवदर्शी आपल्याला पाहायला मिळते.. आणि तसे प्रयोग ही तेथे केले जाते. आणि हे सादरीकरण खरखुर दाखवण्यासाठी वाटेल त्या प्रकाराची तयारी सुध्दा केली जाते.

मात्र नकटीच्या लग्नात सत्राशे साठ विघ्न म्हणतात असच काहीस सध्या सोनी चॅनेलवर चर्चेत असलेली मालिका बेहद च्या सेटवर घडली आहे. या मालिकेच्या सेटवर लागलेल्या आगीमुळे तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा या संकटसमयी अभिनेता कुशल टंडनने मात्र मोठ्या धाडसाने अभिनेत्री जेनिफर विंगेटचा जीव वाचवला.

‘बेहद’ या मालिकेमध्ये लग्नाच्या दृश्याचे चित्रिकरण सुरु असताना मंडप असलेल्या सेटवर अचानक आग लागली. त्यावेळी नेमके सप्तपदीच्या दृश्याचे चित्रिकरण सुरु होते. अभिनेता कुशल टंडन त्यावेळी सेटवरच उपस्थित होता. त्या मंडपाच्या सेटवर आग झपाट्याने परसली आणि अभिनेता कुशल टंडनने परिधान केलेल्या शेरवानीच्या ओढणीलाही आग लागली. कुशलने लगेचच ती ओढणी काढून फेकून दिली. यावेळी मालिकेच्या सेटवर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. आग लागल्यामुळे अनेकांचीच पळापळ सुरु झाली. कुशलही तेथून निघून गेला. पण, अभिनेत्री जेनिफर विंगेट मात्र तेथेच एकटीच राहिली. यावेळी कुशलच्या समयसूचकतेमुळे त्याच्या शेरवानीच्या ओढणीलाच बांधली गेलेली जेनिफरच्या लेहंग्याची ओढणीही फेकली गेली होती. जेनिफर एकटी असल्याचे लक्षात येताच कुशल लगेचच सेटवर आला आणि त्याने जेनिफरला तेथून बाहेर काढले. त्यानंतर लगेचच सेटवरील अॅक्शन टीमने येऊन ही आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. हा सर्व प्रकार काही कळण्यापलीकडचाच होता. हा प्रसंग निभावून नेल्याबद्दल आणि आपला जीव वाचविल्याबद्दल अभिनेत्री जेनिफर विंगेटने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन कुशलचे आभार मानले आहेत. त्यासोबतच तिने सेटवर झालेल्या या घटनेबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक