BREAKING NEWS
HEADLINE NEWS
1200 हून अधिक स्पर्धक सहभागाने नवी मुंबई महापौर चषक बुध्दीबळ स्पर्धा यशस्वी
Posted on: 14-02-2017

साईनाथ भोईर, नवी मुंबई

1200 हून अधिक इतक्या मोठ्या संख्येने खेळाडूंनी बुध्दीबळ स्पर्धेत सहभागी होत आपली गुणवत्ता पणाला लावली व महापालिका आयोजित करीत असलेल्या सर्वच स्पर्धा व उपक्रमांना असाच उदंड प्रतिसाद मिळत आहे हे लक्षात घेता नवी मुंबईतले खेळाडू आज चमकत आहेत.

त्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने नवी मुंबई शहरासह देशाच्या नावलौकीकात लक्षणीय भर घालतील असा विश्वास व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी सहभागी बुध्दीबळपट्टूंप्रमाणेच त्यांना पुढे जाण्यासाठी ठोस पाठींबा देणा-या पालकांचे विशेष कौतुक केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दि. 11 व 12 फेब्रुवारी 2017 रोजी सेक्टर 3 ऐरोली येथील श्रीराम विद्यालयात संपन्न झालेल्या  नवी मुंबई महापौर चषक बुध्दीबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

यावेळी महापौर महोदयांसमवेत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या उपसभापती श्रीम. श्रध्दा गवस, नगरसेवक श्री.मनोज हळदणकर व सौ.नंदा काटे,क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व ठाणे जिल्हा बुध्दीबळ असोसिएशनचे पदाधिकारी डॉ.दिपक तांडेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना  नगरसेवक श्री.मनोज हळदणकर यांनी मागील वर्षीपेक्षा या वर्षी बुध्दीबळपट्टूंचा दुप्पट सहभाग लाभल्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगत अशाप्रकारच्या स्पर्धांतूनच खेळाडू विद्यार्थ्यांना स्वत:च्या क्षमतेचा अंदाज येतो व दुस-यांचा खेळ पाहून जिंकण्याची प्रेरणा मिळते अशा शब्दात स्पर्धांचे महत्व विषद केले व या स्पर्धेतून राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तर गाजविणारे खेळाडू निर्माण होतील अशी खात्री व्यक्त केली.

खुल्या पुरुष गटात मिथिल आजगांवकर विजेतेपदाचा मानकरी ठरला तर केतन बोरीचा यांनी उपविजेतेपद संपादन केले. संजिव नायर व ओमकार कडव हे अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.

खुल्या महिला गटात वैभवी जाधव या विजेत्या तसेच समिक्षा पाटील या उप विजेत्या ठरल्या. अलाना विन्सेंट आणि आकांक्षा निकम यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक संपादन केला.

9 वर्षाखालील मुलांच्या गटात यश राणे विजेता आणि यशसिंग नेगी उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. हरीष इनामदार व आरुष साळवी यांनी तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविला.

9 वर्षाखालील मुलींच्या गटात पल्लवी यादव ही विजेतेपदाची आणि सनिधी भट ही उपविजेतीपदाची मानकरी ठरली. मृगया गोटमारे आणि प्राप्ती नाईक यांनी तृतीय व चतुर्थ क्रमांक संपादन केला.

11 वर्षाखालील मुलांच्या गटात विजेत्या पदाचा चषक अर्णव नेहते याने पटकाविला तसेच लक्ष कदम हा उपविजेतेपदाचा आणि निळकंठ श्रेय व हेम सोट्टा हे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले.

11 वर्षाखालील मुलींच्या गटात सौख्यी सावंत ही विजेतेपदाची मानकरी व तन्वी बोराटे ही उपविजेतेपदाची मानकरी ठरली. तसेच सायना चोप्रा व निधी मिश्रा यांनी तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविले.

15 वर्षाखालील मुलांच्या गटात अथर्व जाईल हा विजेतेपदाचा मानकरी व हर्ष नेगी हा उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. तसेच आयुष दिपनाईक व अरिंजय ठाकुर यांनी तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविले.

15 वर्षाखालील मुलींच्या गटात निशिगंधा रामगुडे ही विजेतेपदाची मानकरी व अनुष्का मेनन ही उपविजेतेपदाची मानकरी ठरली. तसेच वेदीका मिश्रा व ग्रीष्मा धुमाळ यांनी तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविले.

दोन दिवस चाललेल्या या बुध्दीबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाच पण त्यासोबत त्यांच्या पालकांनीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत नवी मुंबई महापौर चषक बुध्दीबळ स्पर्धा जल्लोषात पार पाडली

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक