BREAKING NEWS
HEADLINE NEWS
सेना-भाजपाने मुंबईचा विकास केला नाही, फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळे केले
Posted on: 18-02-2017

ऑनलाईन मिडिया, मुंबई

काँग्रेस पक्षाचे खासदार व युवानेते ज्योतिरादित्य सिंधिया आज संध्याकाळी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अंधेरी पूर्व येथील सागबाग नाका - मरोळ मरोशी – जे. बी. नगर – जोगेश्वरी पूर्व येथील बांदा प्लॉट पर्यंत रोड शो मध्ये सहभागी झाले.

या रोड शो मध्ये खासदार व युवानेते ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, शिवसेना – भाजपा गेल्या २० वर्षापासून मुंबई महानगपालीकेत सत्तेत असून सुद्धा मुंबईचा विकास झाला नाही.  मुंबई महानगपालीका आर्थिकदृष्ट्या सक्षम असून सुद्धा शिवसेना – भाजपा ने मुंबईचा कायापालट केला नाही फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळे केले.

मुंबई फक्त भारतातील नाही तर विश्वातील सर्वात सुंदर शहर बनवू शकले असते परंतु त्यांची इच्छाशक्ती नाही, म्हणून हेही घडले नाही. याकरिता मुंबईच्या विकासासाठी काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन खासदार ज्योतिरादित्य सिंधिया समस्त मुंबईकरांना केले.      

 

सदर रोड शो मध्ये खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी आमदार सुरेश शेट्टी उपस्थित होते.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक