BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नागपूर, पुण्यात निकालानंतर मिरवणुका
Posted on: 23-02-2017

मुंबई,

कोणत्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि कुणाला पराभवाचा चेहरा पाहावा लागणार हे उद्याच कळेल. मात्र, निकालानंतर विजय साजरा करताना उमेदवारांना थोडा आखडता हात घ्यावा लागणार आहे. कारण मतमोजणीच्या दिवशी विजयी मिरवणुका, घोषणाबाजी आणि फाटके फोडण्यास नागपूर आणि पुणे पोलिसांनी मनाई केली आहे.

 उमेदवाराच्या विजयाची घोषणा होताच फटाके फोडून जोरदार नारेबाजी करण्याची आणि मिरवणूक काढण्याची आपल्याकडे अलिखित प्रथाच आहे. मात्र विजयाच्या उत्साहात कोणताची अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

 पुणे, नागपूर, रायगडमध्ये उद्या पाचहून अधिक लोकांचा जमाव करण्यास, मिरवणूका काढण्यास, सभा घेण्यास पोलिसांनी मनाई केली आहे

दरम्यान, 10 महापालिका आणि 25 जिल्हापरिषदा उमेदवारांचं भवितव्य मतदार राजांनी एव्हीएम मशिनमध्ये कैद केलं आहे. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती निवडणुकीच्या निकालाची. उद्या सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीची तयारी काही ठिकाणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आली आहे.

 पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम मशिन मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचवण्यात येत आहेत. मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक