BREAKING NEWS
HEADLINE NEWS
मुख्यमंत्र्यांचा शिवरायांना मानाचा मुजरा,निवडणुकीतील यशानंतर भाजप नेते रायगडावर
Posted on: 25-02-2017

रायगड,

राज्यातील जिल्हपरिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भरभरून यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. शिवरायांप्रमाणे रयतेचे राज्य स्थापन करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठीच आम्ही रायगडावर येऊन शिवरायांचा आशिर्वाद घेतला अशी प्रतीक्रीया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 10 महानगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर सभा घेतल्या. पारदर्शक कारभाराचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील मतदारांनी भरभरून मते दिली त्याच बळावर भाजपने राज्यात कधीनव्हे इतके यश संपादन केले. मुंबई आणि ठाणे वगळता इतर आठही महानगरपालिकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. मुंबईतही अभुतपुर्व असे यश भाजपने मिळवले आहे. 31 जागांवरून थेट 81 जागांपर्यंत मजल मारून भाजप मुंबईत क्रमांक दोनचा पक्ष बनला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह रायगडावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आम्ही रायगडावर येऊन आशिर्वाद घेतला, अशी भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक