BREAKING NEWS
HEADLINE NEWS
शाहरुख खान चौथ्या यश चोप्रा पुरस्काराने सन्मानित
Posted on: 27-02-2017

ऑनलाईन मिडीया, मुंबई

लोकप्रिय अभिनेते शाहरुख खान यांना चौथ्या यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते शाहरुख खान यांना जुहू येथील हॉटेल जे डब्ल्यू मेरियट येथे हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.  खासदार टी सुब्बरामी रेड्डी यांच्या टी एस आर फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. दहा लाख रुपये, सोन्याचे कडे व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कार्यक्रमाला श्रीमती चे विनोदा, गतवर्षीच्या यश चोप्रा पुरस्कार विजेत्या अभिनेत्री खासदार रेखा, ज्येष्ठ अभिनेते तसेच माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा, खासदार टी. सुब्बरामी रेड्डी, खासदार वेणुगोपाल धूत, शशी रंजन व इतर मान्यवर उपस्थित होते. भारत रत्न लता मंगेशकर व अमिताभ बच्चन यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक