BREAKING NEWS
HEADLINE NEWS
एअरटेल धमाका, 145 रूपयांत 14 जीबी 4G आणि कॉल्स फ्री
Posted on: 28-02-2017

मुंबई,

रिलायन्स जिओमुळे भारतीय टेलीकॉम कंपन्यांमध्ये स्वस्त इंटरनेट सुविधा देण्याची शर्यत सुरू आहे. सर्व कंपन्या एकाहून एक सरस ऑफर आणत आहेत. भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम  एअरटेलनेही दोन धमाकेदार ऑफर आणल्या आहेत.

145 रूपये आणि 349 रूपयांच्या रिचार्जवर कंपनीकडून एक महिन्यासाठी 14 जीबी 4 जी डेटा देत आहे. याशिवाय महिनाभरासाठी अमर्याद व्हॉईस कॉल देण्यात येणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, 145 रूपयांच्या रिचार्जवर एअरटेल टू एअरटेल व्हॉईस कॉल फ्री असतील तर 349  रूपयांच्या रिचार्जवर कोणत्याही नेटवर्कवर कॉल फ्री असणार आहेत. यापुर्वी 16 जीबी डेटा आणि फ्री कॉलसाठी एअरटेल ग्राहकांना 1199 रूपयांचं रिचार्ज करावं लागत होतं.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक