BREAKING NEWS
HEADLINE NEWS
रताळ्याची कचोरी
Posted on: 28-02-2017

साहित्य:

१ मूठ चिरलेली कोथिंबीर,

१ वाटी खोवलेलं खोबरं,

४-५ हिरव्या मिरच्या,

५० ग्रॅम बेदाणा,

मीठ आणि साखर,

पारीसाठी २५० ग्रॅम रताळी,

१ मोठा बटाटा,

किंचितसं मीठ,

साराण भरलेली कचोरी घोळण्यासाठी भगरीचं पीठ

तळण्यासाठी तूप.

कृती :

रताळी आणि बटाटे उकडून घ्यावेत. सोलून हाताने थोडे कुस्करून घ्यावेत. नंतर पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.

त्यात थोडं मीठ घालावं. अर्धा चमचा तूप घेऊन त्यावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत.

नंतर गॅस बंद करून त्यात इतर सर्व वस्तू घालून सारण करावं. रताळ्याच्या मिश्रणाची पारी करून त्यात थोडं सारण भरावं.

अशा हव्या तेवढ्या पाऱ्या करून सारण भरून ठेवाव्यात. आणि खाण्याच्या आधी भगरीच्या पीठात घोळून त्या तुपात तळून घ्याव्यात.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक