BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नोकियाच्या सहकार्यानं एअरटेल लवकरच देणार 5G सेवा
Posted on: 02-03-2017

मुंबई,

नोकिया आणि एअरटेल मिळून लवकरच इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि 5G टेक्नॉलॉजी आणणार आहेत. बुधवारी दोन्ही कंपन्यांनी याबाबतच्या कराराची घोषणा केली.

5G आणि आयओटी अॅप्लिकेशन या तंत्रात जीवन बदलून टाकणारी क्षमता आहे. त्यामुळे भविष्यात नोकियासोबत मिळून ही सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यास उत्सुक असल्याचं एअरटेलचे संचालक (नेटवर्क सेवा) अभय सावरगावकर यांनी सांगितलं.

5G मुळे हायस्पीड डेटा देता येणार असल्याने नेटवर्कचं स्पीडही वाढवता येईल. या सेवेमुळे नवीन ग्राहक जोडण्यास मदत होईल, असंही एअरटेलने सांगितलं.

एअरटेलसोबत 2G, 3G आणि 4G सेवा यशस्वीपणे ग्राहकांपर्यंत पोहचवल्यानंतर आता 5G ची घोषणा करणं नोकियासाठी आनंदाची बाब असल्याचं नोकियाचे भारताचे मार्केटिंग हेड संजय मलिक यांनी सांगितलं.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक