BREAKING NEWS
HEADLINE NEWS
गीता गवळी शिवसेना सोडुन भाजपमध्ये जाण्याची शक्यता
Posted on: 03-03-2017

मुंबई,

महापौरपदासाठी एक-एक सदस्य महत्वाचा असताना, अरुण गवळी यांच्या कन्या आणि अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा देऊन शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. मात्र यासाठी शिवसेनेत अपक्ष फोडण्यासाठी सुरु असलेली अंतर्गत चढाओढच जबाबदार असल्याचं कळतंय.

शिवसेनेचा महापौर बनवण्यासाठी गेली दहा वर्ष गीता गवळी यांनी सेनेला पाठींबा दिला होता.गीता गवळी यांच्याशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी गेली बारा वर्ष उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे होती. गेली दोन टर्म महापालिका निवडणुकीत आणि एकदा विधानसभा निवडणुकीत नार्वेकर यांच्या मध्यस्थीने गीता गवळी यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता.

मात्र यंदा महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत असल्याने पहिल्यांदा गवळींविरोधात शिवसेनेने अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला होता.

तरीही गीता गवळी शिवसेनेशी वाटाघाटी करण्यास तयार होत्या. उद्धव ठाकरे यांची गीता गवळी यांच्याशी फोनवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांची सेनाभवन येथे भेट करून देतो असं आश्वासन देऊन एकनाथ शिंदे यांनी गवळी यांना शिवसेनाभवनात बोलवून घेतले.मात्र उद्धव ठाकरे सेनाभवनात नव्हते हे कळल्यावर गीता गवळी संतापल्या. त्याचबरोबर मीडियाची उपस्थिती ही त्यांना फारशी रुचली नाही. त्यामुळे गवळी यांची एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यासोबतची बोलणी फिस्कटली आणि त्या सेनाभवनातून परतल्या.

मात्र अपक्षांना फोडण्यासाठी सुरु झालेली सेनेतली चुरस यावेळी मात्र भाजपच्या पथ्यावर पडली. त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अखेर गीता गवळी यांनी गेली दहा वर्षांची शिवसेनेची साथ सोडली आणि भाजपच्या गटात सामिल झाल्या.याआधी अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी काल रात्री वर्षावर जाउन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर त्यापूर्वी गीता गवळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही भेटल्या होत्या त्यामुळे गीता गवळी यांचा पाठींबा नक्की भाजप की शिवसेनेला? हा प्रश्न अनेकांना पडला होता.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक