BREAKING NEWS
HEADLINE NEWS
लष्कराच्या पेपर फुटीप्रकरणी आणखी तिघांना घेतलयं ताब्यात
Posted on: 03-03-2017

नागपूर,

लष्कराच्या पेपर फुटीप्रकरणी नागपुरातून आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय.

ठाणे क्राईम ब्रांचनं रात्री उशिरा ही कारवाई केलीय. हे तिघेही सैन्याचे लिपिक असल्याचं समजतंय.

रविंद्र कुमार, धरमसिंग आणि निगमकुमार पांडे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही नागपुरातून ठाण्यात आणण्यात आलंय.

26 फेब्रुवारीला लष्करातील विविध पद भरतीसाठी लेखी परीक्षेचा पेपर होता. मात्र, परीक्षेपूर्वीच हा पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्याने ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकाने राज्यात विविध ठिकाणी धाड टाकून सुमारे चारशे जणांना ताब्यात घेतले होते. यात विद्यार्थी, कोचिंग क्लासेसचे संचालक आणि दलालांचा समावेश होता.

या पेपर लिक प्रकरणी सुरुवातीपासूनच सैन्यातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा होती. अटकेतील आरोपींनीदेखील सैन्यातील कर्मचाऱ्यांची माहिती दिली. पेपरची सीडी कुठून देण्यात आली? तसेच वरिष्ठ पातळीवर या प्रकरणात कोण गुंतले आहे? याचा तपास क्राईम ब्रांचला करायचा आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक