BREAKING NEWS
HEADLINE NEWS
जगातील सुंदर महिलां मध्ये प्रियांका २ ऱ्या क्रमांकावर
Posted on: 03-04-2017

लॉस एजेल्स,

अँजेलिना जोली, एमा वॉटसन, ब्लेक लायवली आणि मिशेल ओबामा यांच्यासारख्या दिग्गज महिलांना मागे टाकून बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राने जगातल्या सर्वात सुंदर महिलांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

लॉस एजेल्समधील सोशल मीडिया नेटवर्क बजनेटने केलेल्या सर्वेक्षणानंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यात प्रियंका पॉप स्टार बेयॉन्से पेक्षा काहीच अंक दूर आहे. बेयॉन्सेनं या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

प्रियंकाने स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरुन याची माहिती देऊन चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हणलंय की, ''बजनेट आणि मला वोट करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. बेयॉन्से माझ्यासाठी नेहमीच नंबर वन आहे.''

या यादीत तिसऱ्या स्थानावर प्रसिद्ध मॉडेल टेलर हिल, त्यानंतर एमा वॉटसन चौथ्या स्थानी आहे. तर पाचव्या स्थानावर हिलेरी क्लिंटन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अॅजेलिना जोलीला आठव्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. तर यंदाची ऑस्कर विजेती एमा स्टोन 12 व्या स्थानी आहे. सुपर मॉडेल गिगी हदीद 13 व्या क्रमांकावर आहे.

या यादीत 'वंडर वुमन'ची स्टार अभिनेत्री गॅली गॅडोट, ओपरा विनफ्रे, नाओमी कॅम्पबेल, एलिसिया विकेंडर, मार्गट रॉबी आणि 'बेवॉच' या सिनेमातील प्रियंकाची सहकलाकार एलेक्सांद्रा डॅडारियो आदींचाही समावेश आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक