BREAKING NEWS
HEADLINE NEWS
अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात इसिसचे 36 दहशतवादी ठार
Posted on: 14-04-2017

ऑनसाईन मिडिया, वॉशिंग्टन

अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या सर्वात मोठ्या नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ल्याची तीव्रता हळूहळू जगासमोर येऊ लागली आहे.

या हल्ल्यात आयसिसच्या 36 अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे. एएफपी वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

अमेरिकेने गुरुवारी संध्याकाळी 7 वा. अफगाणिस्तानवर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे.

ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण पाकिस्तान सीमेनजीक पेशावरपासून १०० किमी अंतरावर आहे. यात केरळच्या एकासह 36 जण ठार झाल्याचे सांगण्यात येते. मृतांचा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आपल्या एका जवानाच्या मृत्यूच्या बदल्यात हा हल्ला केल्याचा अमेरिकेने दावा केला आहे. हा जवान गेल्या शनिवारी अतिरेक्यांविरोधातील कारवाईत शहीद झाला होता. हा बॉम्ब सामान्य लढाऊ विमानाद्वारे टाकला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे मालवाहू एमसी-१३० विमानाने तो टाकला.

आयसिसच्या 7 हजार दहशतावादी तळांवर अमेरिकेनं जगातील सर्वात मोठा बिगर आण्विक बॉम्ब जीबीयू 43 ने अफगाणिस्तानवर हल्ला केला. तब्बल 11 हजार किलोंचा हा बॉम्ब आहे.

या बॉम्बला ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’ संबोधलं जातं.

ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण पाकिस्तानच्या पेशावरपासून 100 किमी अंतरावर आहे. यामध्ये शेकडो जणांचा जीव गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा बॉम्ब सामान्य लढाऊ विमानाद्वारे टाकला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे मालवाहू एमसी-130 विमानाने तो टाकला.

विशेष म्हणजे भारतातील आयसीसची वाढती पाळंमुळं हा चिंतेचा विषय असताना भारतासाठी हा बॉम्बहल्ला अतिशय महत्वाचा आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे आपण अध्यक्ष झालो तर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवर सर्वात मोठा बॉम्ब टाकू हे डोनाल्ड ट्रम्प यांचं निवडणूक प्रचारातील वाक्य त्यांनी खरं करुन दाखवलं.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक