BREAKING NEWS
HEADLINE NEWS
राज्यातील वीटभट्टी व्यावसायिकांचे आझाद मैदान मुंबई येथे होणार आंदोलन
Posted on: 14-04-2017

नाशिक,

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या नेतृत्वाखाली वीट व्यावसायिकांसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे दि.१८ एप्रिल २०१७ रोजी एकदिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे विभागीय संपर्क प्रमुख कचरू वैद्य व युवक अध्यक्ष ज्ञानेश रसाळ यांनी दिली आहे. सदर धरणे आंदोलन सकाळी ११ ते ६ या वेळेत होणार आहे.

सदर आंदोलनासाठी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्याकडून महाराष्ट्र राज्यातील कुंभार समाजातील सर्व नागरिकांना संघटीत करण्यात येत आहे. या आंदोलनात कुंभार समाजाच्या वीटभट्टी व्यावसायिकांकडून अकृषिक एनए (N.A) व माती उखन्नन यावर २०१० पासून आकारलेल्या अनाठायी दंडाचे पैसे परत मिळावेत,महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यात समान विटभट्टी धोरण राबवण्यात यावे, आणि कुंभार समाजावर तलाठी / तहसीलदार यांच्याकडून बळजबरीने वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम त्वरित परत करण्यात यावी , तसेच गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र मातीकाम कलाकारी रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहे.

सदर आंदोलन अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष  देवरावजी कापडे (अकोला), नागनाथराव कुंभार (उस्मानाबाद) आणि  संजयजी बेल्लाळे (लातूर ) यांच्या नेतृत्वाखाली होत असून राज्यातील सर्व कुंभार समाजातील समाजबांधव सहभागी होणार आहे. त्यामुळे या आंदोलनास नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुंभार समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आव्हान नाशिक विभागीय पदाधिकारी कचरू वैद्य, ज्ञानेश्वर भागवत, अंबादास गारे, विजय चव्हाण, तुषार गारे,प्रल्हाद सूर्यवंशी ,हेमंत गायकवाड आणि ज्ञानेश रसाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक