BREAKING NEWS
HEADLINE NEWS
स्नॅपचॅट चे सीईओ म्हणाले,भारत हा गरिबांचा देश आहे
Posted on: 17-04-2017

नवी दिल्ली,

भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. त्यामध्ये स्नॅपचॅटचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतू स्नॅपचॅटचा भारतात बिझनेस वाढविण्याचा विचार नाही. स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पिगल यांचे म्हणणे आहे की, 'बिझनेस वाढविण्याच्या दृष्टीने भारत हा खूपच गरीब देश आहे. त्यामुळे भारतात बिझनेस वाढविण्याचा आमचा विचार नाही.

'रायटीमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार 'ग्रोथ ऑफ अॅप्स यूजर बेस इन'च्या झालेल्या बैठकीत इवान स्पीगल यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय स्नॅपचॅट युर्जस सोशल मीडियाद्वारे इवान स्पीगलविरोधी प्रतिक्रिया देत आहेत.

या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. या वक्तव्यामुळे स्नॅपचॅटचे रेटिंग घसरत आहे. अॅप स्टोरमध्ये स्नॅपचॅटचे रेटिंग पाच स्टारवरुन एका स्टारवर घसरले आहे. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी अॅप्सच्या यूझर बेसमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच अॅमेझॉन आणि उबरसारख्या कंपन्यांनी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. 2020 पर्यंत परदेशी अॅप्सचा भारतातील यूझरबेस अडीच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक