BREAKING NEWS
HEADLINE NEWS
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
Posted on: 19-04-2017

ऑनलाईन मिडिया, नाशिक

नाशिक येथे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने भगूर येथे बैलगाड़ीतुन स्वागत करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी शेतकरी कर्ज, शेतमालाला हामीभाव न भेटल्याने व गेल्या काहीवर्षापासून वातावरणातील बदलामुळे भगूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार याना दिले.

बलकवडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भगूर परिसरात द्राक्ष, कांदे, भाजीपाला ह्याचे उत्पन्न जास्त प्रमाणात आहे. 'अच्छे दिन'ची आस दाखवणा-या केंद्र सरकार ने शेतकर्यां ना बुरे दिन दाखवले आहेत. शेतमालाला हमीभाव न भेटल्याने व गेल्या काही वर्षापासून वातावरणातील बदलामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऐन पीकपेरणी करण्याच्या काळात कधी अवकाळी पाऊस तर गारपीटीचा फटका शेतीपिकाला मारक ठरत आहे तर कधी दुष्काळाचे संकट जिल्ह्याला वेधून घेत आहे.

सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील बहुतांश भागातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही. या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही. शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांसाठी मदत, अनुदानांच्या घोषणा होतात. चर्चा करीत कार्यवाही केल्याचे सांगितले जाते पण आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही. आज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर पिण्याचे पाणी, तसेच जनावरांना जगविण्यासाठी चारा व पाणी या दोन्हींचा प्रश्न आहे. विजेचा व भारनियमाचा प्रश्न भगूर, दे.कॅम्प पंचक्रोशीच्या शेतकर्यांना भोगावा लागत असल्याचे म्हटले आहे.

शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आज श्रमशक्ती जवळजवळ नाही हे मानले पाहिजे आणि त्यात डोक्यावर कर्जाचे ओझे. मग हताश होऊन शेतकरी नाईलाजाने कुटुंब समवेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला आहे.  शेती सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी आज आपल्या कारभारणींच्या मंगळसूत्रांसह किडूकमिडूक गहाण ठेवून सोने तारण कर्ज घेतले आहे व परिस्थितीचे चटके महिलांना देखील शोसावे लागत आहेत.

झोपेचे ढोंग केलेले शासनाने खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची भ्रमनिराशा केली आहे. आपल्या या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आमच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे  निवेदनात शेवटी म्हटले आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, अॅड गोरखनाथ बलकवडे, मुन्ना अन्सारी, सागर गोडसे, विशाल बलकवडे,अरविंद गवळी, चेतक बलकवडे, राजु राजगुरू, पुनम बर्वे, शिल्पा जाधव, संतोष हेंबाडे, प्रेमा राजगुरू यांच्यासह अनेक शेतकरी व महिला उपस्थित होते.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक