BREAKING NEWS
HEADLINE NEWS
मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजेतुन दोन तरुणांची नग्न धिंड
Posted on: 20-05-2017

ऑनलाईन मिडिया, पुणे

मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजातून दोन तरूणांना जोरदार फटके लगावत त्यांची नग्न धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्याच्या कर्वेनगरमधील मावळे आळीत ही घटना घडली असून नग्न धिंड काढणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. नग्न धिंड काढण्यात आलेल्या मुलांपैकी एक मुलगा आणि नवीन खुराना यांची मुलगी एकाच शाळेत शिकतात. हा मुलगा आपल्या मुलीची छेड काढत असल्याचा संशय खुराना यांना होता. हा तरूण त्याच्या मित्रासोबत जलतरण तलावावरून येत होता. त्यानंतर एका ठिकाणी तो त्याच्या काही मित्रांशी गप्पा मारत बसला होता. काही वेळाने खुराना हे त्यांच्या मुलासह चार-पाच लोकांना घेऊन त्या ठिकाणी आले आणि त्या मुलाला शिवीगाळ करायला सुरूवात केली. मुलीची छेड करत असल्याचा आरोप करत त्याला मारहाण करायलाही सुरूवात केली. मारहाण करूनही मन न भरल्याने त्यांनी या तरुणाचे आणि त्याच्या मित्राचे कपडे उतरवून त्यांना मारहाण केली. त्यानंतर या नग्न धिंडेचा व्हिडिओही काढला आणि त्याला व्हाटसअपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार माहित झाल्यानंतर या तरूणाच्या आईने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी नवीन कुंदन खुराना, यश नवीन खुराना, राजू पिराराम देवासी आणि प्रदीप श्रीकृष्ण साळुंखे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक