BREAKING NEWS
HEADLINE NEWS
ऊस दरवाढीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण
Posted on: 24-05-2017

ऑनलाईन मिडिया, पुणे

गुजरातमध्ये उसाला प्रतिटन ४ हजार ४४१ रुपये दर दिला जातो. मग तो दर महाराष्ट्रात का दिला जात नाही. तसेच, सन २०१६-१७ मध्ये गळीत झालेल्या उसाचे दुसरे बिल प्रतिटन १ हजार रुपये प्रमाणे मिळावे अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

साखर कारखाने पारदर्शकता ठेवत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली .साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करुन पारदर्शकता आणण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे. कष्ट करुन शेतकरी ऊसाचे उत्पन्न घेतो. तरी त्याचा दुसरा हप्ता तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्यास शेतकऱ्यांना ऊसाची लागवड करण्याकरिता मदत होईल. सरकार याबाबत सकारात्मक भुमिका घेईपर्यंत बळीराजा संघटनेने आमरण उपोषण सुरुच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.

उपोषणात संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्यासह साजीद मुल्ला, उत्तम साळुंखे, सुधीर कदम, अमोल चव्हाण, अशोक सलगर, अजित बोरकर, दादा काळे, साधू राऊत यांच्यासह पुणे जिल्ह्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी शासन व साखरसम्राट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ऊस दरवाढीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण  

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक