BREAKING NEWS
HEADLINE NEWS
उत्तराखंडमध्ये भाविकांच्या बसला अपघात, २२ ठार
Posted on: 24-05-2017

ऑनलाईन मिडिया, उत्तरकाशी  

उत्तराखंड मधील उत्तरकाशी येथील गंगोत्री धामचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांच्या बसवर मंगळवारी संध्याकाळी काळाने घाला घातला. ३० प्रवाशी असलेली ही बस अडीचशे फूट खोल दरीत कोसळल्याने २० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेकजण मध्यप्रदेशातील इंदूर येथील रहिवाशी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे यात्रेकरू गंगोत्री धामचे दर्शन करून येत असतानाच हा अपघात झाला. स्थानिक पोलीस, भारत तिबेट पोलीस दलाच्या जवानांनी २० जणांचे मृतदेह बाहेर काढलेत. तर आठ जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उर्वरित प्रवासी भागीरथी नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, या अपघाताबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रुपयांची आणि जखमीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत देण्याचे त्यांनी जाहीर केले. तर, मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अपघातात मृत्यूमुखी झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत जाहीर केली.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक