BREAKING NEWS
HEADLINE NEWS
खोटारड्या पोलीस दाम्पत्याला बडतर्फीची नोटीस
Posted on: 24-05-2017

ऑनलाईन मिडिया, पुणे

एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पोलीस दलातील दिनेश आणि तारकेश्वरी राठोड दांपत्य. पोलीस दलातील एका दाम्पत्याने एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खोटा दावा केला होता. त्या पोलीस दाम्पत्याला सेवेतून बडतर्फ का करु नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी दाम्पत्याला अगोदरच निलंबित करण्यात आलेले आहे.

पुणे पोलीस दलातील कॉन्टेबल दिनेश राठोड आणि तारकेश्‍वरी राठोड असे नोटीस बजावलेल्या निलंबित दाम्पत्याचे नाव आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात राठोड दाम्पत्यांनी एव्हरेस्ट मोहिमेसाठी रजा घेतली होती. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी काठमांडू येथे पत्रकार परिषद घेऊन एव्हरेस्ट सर केल्याची घोषणा केली. एव्हरेस्ट सर करणारे भारतातील पहिले दाम्पत्य असल्याचा दावा त्यांनी केला होता.

त्यांच्या या दाव्यावर एका गिर्यारोहक संघटनेने १७ जून रोजी आक्षेप घेत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यानुसार शुक्ला यांनी राठोड दाम्पत्याच्या मोहिमेची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांनी या दाम्पत्याला सेवेतून बडतर्फ का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान, राठोड दाम्पत्याचे एव्हरेस्ट सर केल्याची छायाचित्र 'मॉर्फिंग' केल्याचे कोलकत्ता येथील एका संगणक अभियंत्याने स्पष्ट केले. यावर नेपाळ सरकारने चौकशी करुन राठोड दाम्पत्याला नेपाळमध्ये गिर्यारोहणाला १० वर्षे बंदी घातली.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक