BREAKING NEWS
HEADLINE NEWS
हडपसर वेस समोर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
Posted on: 03-06-2017

ऑनलाईन मिडिया, पुणे

2 जुन रोजी नॅशनल हायवे  क्रं.9  हडपसर वेस समोर धरणे आंदोलन करण्यात आले.. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यानी सरकारचा निषेध केला.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे, स्वॉमीनाथन आयोग लागू करा, शेतीला बिगर व्याजी कर्ज पुरवठा करा, शेतकऱ्यांचे विजबिल माफ करा. या व इतर मागण्यांसाठी संपावर गेलेल्या शेतकऱ्यांनी  धरणे  आंदोलन करुण सरकारचा निषेध केला. जो पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करत नाही तो पर्यंत शेतकरी संप मागे घेणार नाहीत असा निरधार आंदोलक शेतकऱ्यांनी केला.

या मोर्चाचे नेत्रत्व जनगर्जना मंचा चे अध्यक्ष विठठल सातव,स्वप्नील डांगमळी,मुकेश वाडकर,योगेश हिंगणे,योगेश गोंधळे, वैभव माने ,महेश पवार, महेंद्र बनकर ,चंद्रकांत मगर ,राजेंद्र नेवसे ,दुर्गाडे , सुशांत सातव ,सनी लांडगे , व शेतकरी उपस्थित होते.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक