BREAKING NEWS
HEADLINE NEWS
आयर्लंडच्या पंतप्रधानपदी लिओ वराडकर यांची बहुमताने निवड
Posted on: 03-06-2017

ऑनलाईन मिडिया, आयर्लंड

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मूळचे मालवणकर असलेल्या लिओ वराडकर (३८) यांची बहुमताने निवड झाली आहे. वराडकर यांना सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम फेरीत ७३ पैकी ५१ मते मिळाली. ऐतिहासिक विजय मिळवत वराडकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.

आयर्लंडमध्ये २००७ साली झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली होती. ‘पंतप्रधान झाल्यास देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा तसेच राजकीय स्थैर्य देण्याचा माझा प्रयत्न असेल,’ अशी भूमिका वराडकर यांनी मांडली होती.

लिओ गेल्या ३७ वर्षांत एकदाही जन्मगावी आलेले नाहीत. मात्र त्यांचे वडील डॉ. अशोक विठ्ठल वराडकर दर दोन वर्षांनी वराड (ता. मालवण) येथे सपत्नीक भेट देतात. लिओ यांना भारतात येण्याची प्रचंड इच्छा आहे. मात्र ते आयर्लंडच्या राजकारणात भरपूर व्यस्त असतात, असे वडील डॉ. अशोक वराडकर यांनी २०१३ मध्ये सांगितले होते. लिओ समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते आहेत आणि आयर्लंडच्या तरुण वर्गात जास्त लोकप्रिय आहेत.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक