BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नव उद्योजकांसाठी मोफत मार्गदर्शन
Posted on: 03-06-2017

ऑनलाईन मिडिया, मुंबई

लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स यांनी ३१ व्या लक्षसिध्दी सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा ६ जून २०१७ रोजी,सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे.

जागतिक स्तरावरील  ब्रँड व नेतृत्व याबाबतचा २०१५ सालचा आशिया व गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिलचा पुरस्कार मिळालेले डॉ. अविनाश फडके हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. या सोहळ्यामध्ये भविष्यात उद्योजक होऊ पाहणाऱ्या तरुणांना व लघु उद्योजक यांना 'उद्योग चिकित्सा' या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत. या भागामध्ये उद्योगामध्ये येणाऱ्या अडचणी, त्यांना कशा प्रकारे सामोरे जावे. या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

कार्यक्रमाची उपस्थितीची नोंदणी करणे अनिवार्य आहे त्यासाठी संपर्क 7666426654, 9619465689 तुम्ही ऑनलाईन नोंदणी सुद्धा करू शकता त्यासाठी https://goo.gl/GCZxoo या लिंकचा वापर करा. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवेदन आयोजकांनी केले आहे.   

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक