BREAKING NEWS
HEADLINE NEWS
हरयाणातील दलितांचे संरक्षण करणार
Posted on: 05-06-2017

ऑनलाईन मिडिया, हरयाणा

हरयाणामध्ये दलितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी विशेष दक्षता घेऊन दलितांचे संरक्षण करणार एकाही दलितावर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही  असे आश्वासन हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांना दिले.

नवी दिल्ली तिल हरयाणा भवन मध्ये आज  ना .रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन हरयाणातील दलितांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली .

वन रँक वन पेंशन साठी आंदोलन करणारे सैन्य अधिकारी रामकिशन गरेवाल यांनी आत्महत्या केली होती  ते दलित समाजाचे होते त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर निधी म्हणून 10लाख रूपयांची मदत हरयाणा सरकार तर्फे देण्याची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री खट्टर यांनी मान्य केली असून लवकरच दिवंगत रामकिशन गरेवाल यांच्या कुटुंबियांना हरयाणा सरकारतर्फे ही मदत देण्याचे  खट्टर यांनी मान्य केले आहे .

हरयाणा मध्ये जाट समाजाला आर्थिक निकषावर

नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे . त्यसाठी संसदेत कायदा करून आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहुन वाढवून 75 टक्क्यांपर्यंत केली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत हरयाणा सरकारने ही जाट आरक्षणाबाबत  अनुकूल भूमिका घेण्याचे आवाहन केंद्रियराज्यमंत्री  ना रामदास आठवले यांनी  मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना केले .यावेळी रिपाइंचे हरयाणा प्रदेश अध्यक्ष अनिल बाबा ;चन्दन आदि मान्यवर उपस्थित होते .

5 जूनला केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचा हरयाणा दौरा

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले  हे उद्या सोमवार  दि 5 जून रोजी हरयाणा मधील सोनीपत ;पानीपत ; कर्णाल  आणि रोहतक या चार जिल्ह्यांचा दौरा  करणार आहेत .

पानीपत येथे  संत कबीर जयंती महोत्सव मध्ये ना रामदास आठवले प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित राहणार असून रेहडाना आणि गोहाना येथे रिपाइं तर्फे आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्ये प्रमुख अतिथि म्हणून ते उपस्थित राहणार आहेत .  तसेच कर्णाल येथे सैनी  समाजाचे सम्मेलन आयोजित करण्यात आले असून त्या सम्मेलनास ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत

 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक