BREAKING NEWS
HEADLINE NEWS
मराठ्यांच्या इतिहासातील आणि मनामनातील सोन्याचा क्षण शिवराजाभिषेक दिन
Posted on: 06-06-2017

कोमजलेल्या स्वाभिमानाला आणि करपलेल्या स्वातंत्र्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देणारा... शिवराज्याभिषेक दिन

चौदाव्या शतकात इ.स.१३१७ साली दिल्लीच्या सुलतानांनी अल्लाउद्दीनपुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठा स्वराज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रच्या भूमीवर साडेतीनशे वर्षे स्वातंत्र्यसूर्य उगवलाच नव्हता.सर्वत्र पारतंत्र्याचा,गुलामीचा,आवहेलनेचा,दु:खाचा आणि संकटाचा असा गडद अंधार पसरला होता.या अंधाराला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे भोसले यांनी पेटवली,ती मशाल साधीसुधी नव्हती.तिने सह्याद्रीच्या दऱ्याखोरीतच नव्हे तर समस्त महाराष्ट्र भूमी प्रकाशाने उजळून टाकली. या मशालीचे देदीप्यमान अविष्कार म्हणजे शिवरायांनी दि.६ जुन १६७४ इ.स.रोजी रायगडावर घडवून आणलेला आपला अधभूत असा राज्याभिषेक!

 शिवराजाभिषेक म्हणजे फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानातील समस्त जनतेने " रयतेचा राजा " म्हणून शिवरायांचा केलेला गौरव अखिल हिंदुस्थानातील जनतेच्या रक्षणासाठी , कल्याणासाठी छत्र बनून सिंहासनावर आरूढ झालेले सार्वभौम " राजा शिवछत्रपती ".

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक