BREAKING NEWS
HEADLINE NEWS
आधुनिक सावित्रींची वटपौर्णींमेनिमित्त वटवृक्षाचे रोपण
Posted on: 09-06-2017

ऑनलाईन मिडिया,  नाशिक

“जन्मोजन्मी हाच पती लाभो” असे साकडे घालत आधुनिक सावित्रींनी गुरुवारी वटपौर्णींमेनिमित्त वटवृक्षाचे रोपण करून वटपौर्णिमेचा सण साजरा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्यावतीने भगूर परिसरात वटपूजा करायला आलेल्या महिलांच्या हातून वृक्षारोपण करून पर्यावरणसंवर्धनाला साथ द्या असे अह्वान करण्यात आले.

एक पूर्ण वाढलेले वादाचे झाड एका तासाला ७१२ किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते तसेच जास्तीतजास्त कार्बन वायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून हवा शुद्ध ठेवतो संसारगाड्याला जुंपलेल्या स्रीवर्गाला वर्षातून एकदा वट वृक्षाच्या आरोग्यदायी गुणधर्माचा लाभ व्हावा ह्या हेतूनेच वट सावित्रीचे व्रत करण्याची परंपरा वटपौर्णिमेच्या दिवशी सुरु झाली. वडाला प्रदिक्षणा घालून प्राण शक्तीला अहवान करणे शरीरातील निर्जीव पेशींना शुद्ध प्राणवायू पुरवून सजीव करणे अश्या आरोग्यला हितकारी गोष्टींचा हया संपूर्ण पूजेत अंतर्भाव केलेला असतो. सासुरवाशिणिंना एकदिवस मैत्रिणींसोबत हसत-खेळत वेळ घालवून विरंगुळा मिळावा ह्या हेतूने सौ प्रेरणा बलकवडे यांनी वृक्षरोपण करून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली. एकमेकीना हळदी कुंकू लावत अन ओटी भरतानाच सुवासिनींनी उत्सवात सेल्फिचा रंग भरला.

​आजच्या स्वताला सुशिक्षित म्हणवणाऱ्या महिला वटवृक्षचे महत्व व प्राचीन ज्ञान न समजून  घेता वटवृक्षाची फांदी तोडून पूजेचे सोपस्कार उरकतात आणि दुसरीकडे गावातील स्त्रिया झाडाचे महत्व जाणून झाडाखाली जाऊनच पूजा करत असतील तर मग अशिक्षित कोण आणि सुशिक्षित कोण? असे वक्तव्य सौ प्रेरणा विशाल बलकवडे यांनी बोलताना केले. पतीच्या दीर्घायुष्याची मंगल कामना करताना झाड तोडून एक जीव ओरबाडून आणून  नंतर त्याला फेकून देणे म्हणजे मांगल्य व पवित्र्यची निशाणी असलेल्या वटसावित्रीच्या व्रताला आलेलं हे आधुनिक स्वरूप या व्रताचा मूळ आत्मा हरवून बसलं आहे. आज वृक्ष रोपण हि काळाची गरज आहे म्हणून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ प्रेरणा बलकवडेयांनी महिलांना परंपरा जपत पर्यावरणासाठी वृक्षारोपण करण्याचे अह्वान केले. या वेळी भारती बलकवडे, पूनम बर्वे, रुपाली व्यवहारे, वैशाली देवगिरे, पुष्पा सहारे, पूजा डावरे, संगीता झांजरे, वंदना वडनेरे, सुषमा गायकवाड, वर्षा पंडोरे, पार्वताबाई साळवे  आदिंसह महिला उपस्थित होत्या.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक