BREAKING NEWS
HEADLINE NEWS
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्री फडणवीस कटिबद्ध
Posted on: 13-06-2017

ऑनलाईन मिडिया, मुंबई

महाराष्ट्र सरकार ने सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सात बारा कोरा करण्याच्या  घेतलेल्या  समाधानकारक  निर्णयाचे स्वागत करून  शेतकरी कर्जमाफीचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती  सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी ;  समृद्धीसाठी  कटिबद्ध असलेले सरकार आहे  याचा प्रत्यय देणारा स्वागतार्ह  निर्णय  असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले  यांनी आज व्यक्त केली .


शेकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी रिपब्लिकन पक्षाचीही सुरुवाती पासून मागणी होती . शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशी लागू व्हाव्यात यासाठी आपण केंद्र सरकार कडे पाठपुरावा करू असे ना रामदास आठवले म्हणाले . या निर्णयानंतर सर्व शेतकऱ्यांनी नियोजित आंदोलन रद्द केल्याबद्दलच्या शेतकऱ्यांच्या निर्णयाचे ना आठवलेंनी स्वागत केले आहे .

महसूल मंत्री  चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वातील  उच्चाधिकार मंत्रीगट यांचेही अभिनंदन करून शेतकरी  कर्जमाफीसाठी सरकारशी चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारून एकत्र आलेल्या सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांचेही ना रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे .

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक