BREAKING NEWS
HEADLINE NEWS
प्रशांत कांबळे....युवा पत्रकारितेचा बळी..
Posted on: 21-06-2017

ऑनलाईन मिडिया, मुंबई

तो पत्रकारितेत आला, सत्य शोधण्यासाठी, सत्य समाजापुढे मांडण्यासाठी... अतिशय उत्साही, बातमी काढण्यासाठी कायम धडपडणारा पत्रकार म्हणून त्याने अल्पावधीत  ओळख निर्माण केली. ..मात्र  तोच पत्रकार आज पोलीस स्टेशनच्या चार भिंतीमध्ये बंद आहे, मुख्य आरोपीच्या भूमिकेत पोलिसांनी त्याचा आवाज बंद केलाय. मुंबईतल्या सफाई कामगारांच्या समस्या संवनेदशिलपणे मांडल्यामुळे याच युवा पत्रकाराला मुख्यमंत्र्यांच्या हातून राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.. तोच प्रशांत कांबळे , त्याच्या गावातल्या  एका मुलीच्या आत्महत्येनंतर  यंत्रणेला प्रश्न विचारायला गेला, बातमी  करायला गेला आणि आता आरोपी ठरलाय..मुख्य आरोपी..त्याचा गुन्हा एवढाच की तो पत्रकारिता जगत होता. पत्रकारितेच्या पुढं जाऊन काम करत होता.

प्रशांत कांबळे, तीन वर्षांपूर्वी डोळ्यात स्वप्न घेऊन मुंबईत आला,  सोबत पत्रकारितेतील पदवी..तो अमरावती जिल्ह्यातल्या चांदुर रेल्वे इथ राहणार.. मुंबईत जय महाराष्ट्र नावाच्या एक वृत्तवाहिनीमध्ये तो रुजू झाला. प्रशांतला आपल्या जिल्ह्याविषयी खूप उत्सुकता, तिथून येणाऱ्या बातमीवर तो लक्ष ठेवून असे आणि आल्याआल्या ती दाखवण्यासाठी तो धडपड करायचा..हळूहळू प्रशांतला रिपोर्टींगला बाहेर पाठवणं सुरु केलं.तो चांगले रिपोर्ट करायला लागला. मात्र त्याचं मन गुंतलं होत ते त्याच्या गृहजिल्ह्यात म्हणजे अमरावतीत..प्रशांतने मुंबईतल्या सफाई कामगारांच्या प्रश्नावर स्टोरी केल्यात, त्याचं त्या विषयामधलं सातत्य बघता त्याला सफाई कामगारांच्या जीवांवर रिपोर्ताज बनवायला सांगितलं..चार दिवस मेहनत करून, मेनहोल मध्ये स्वता उतरुन त्याने तो रिपोर्ताज पूर्ण केला..या रिपोर्टनंतर प्रशांत एक संवेदनशील पत्रकार म्हणून पुढे आला.. राज्य शासनाचा उतृष्ट पत्रकार हा पुरस्कार त्याला मिळाला..खर तर तो मुंबईत पत्रकार म्हणून चांगला स्थिरसावर होऊ शकला असता, मात्र त्याला त्याच्या गृहजिल्ह्यात पत्रकारिता करायची होती, पुढे जाऊन त्याला राजकारणातही प्रवेश करायच त्याचं स्वप्न होत. अखेर त्याने मुंबईतलं करिअर थांबवलं आणि तो अमरावतीत एक जिल्हा प्रतिनिधी म्हणून रूजू झाला.

पत्रकारिता करता करता गावातल्या कामासाठी तो यंत्रणेकडे आग्रही असायचा.लोंकाच्या समस्या पत्रकारितेच्या चाकोरीबाहेर जाऊन सोडवायचा..त्याने अनेक स्टिंग ओपरेशन केली ती गाजली.अनेक लोक उघडे पडले. त्याने मंध्यतरी जिल्ह्यातल्या बोगस डॉक्टरसंदर्भात एक मोहीम सुरू केली, त्यासाठी स्टिंग ऑपेशन केली, यंत्रणेच्या नाकात दम आणला, अखेरीस अनेक प्रशासन नमल आणि रुग्णाच्या जीवाशी खेळ करणारे कित्येक बोगस डॉक्टर जेलमध्ये गेले , त्याची प्रॅक्टिस बंद केली गेली. या प्रकरणामुळे अनेकांचे हित संबंध दुखावले गेले, त्यामुळे या सर्व यंत्रणा प्रशांतवर डूख धरून होत्याचं..या सर्वामुळे प्रशांतच्या  मित्रांनी त्याला सावध राहायला सांगितलं आणि जर   पत्रकारितेचा जुणून म्हणजे उत्साह कमी करण्याचा सल्ला दिला..मात्र पत्रकारिता जगणाऱ्या प्रशांतने त्याचं कधी ऐकलं नाही..

प्रशांताच्या गावातल्या एका मुलीनं आत्महत्या केली, उभ्या गावाला कुणामुळं त्या मुलीनं आत्महत्या केली हे माहिती होत, जबाबदार मुलाला अटक करण्याची मागणी गावकऱ्यांची होती, आणि या घटनेचं  वृत्तसंकलन प्रशांत करत होता.बातमी मांडण्याचा प्रयत्न केला. संवेदनशील घटना आहे, मात्र पोलीस काही करत नाही हे चित्र पुढे येताच गावकऱ्यांच्या संतापाचा  भडका उडाला, असल्यांने त्याचा भडक उडाला, पोलीस  लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली..आणि त्यात बळी गेला तो रिपोर्टींग करत असलेल्या प्रशांतचा आणि त्याच्या धडपड्या  पत्रकारितेचा..पोलीस प्रशासनाला कायम प्रशांतचा बातमीदारीचा जाच होताचं, अखेरीस या सर्व प्रकरणाचं खापर या युवा पत्रकारावर फोडल गेलं...प्रशांतवर पोलिसांनी कठोर गुन्हे दाखल केलेत,सामान्य माणसांच्या प्रश्नावर न्याय मागणाऱ्या प्रशांतवर स्वतःला न्याय मागण्याची वेळ आलीये..सध्या प्रशांत  पोलीस कोठडीत आहे..

मात्र प्रशांतसारख्या पत्रकारांची अशी अवस्था बघून आता कुणी पत्रकारीतेच्या पुढं जाण्याचा प्रयत्न  करणार नाही..बातमी करा आणि घरी जा..फॉलोअप, किंवा जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा प्रशांत कांबळे करू हा धडा आता पोलिसांनी घालून दिलाय..सर्वांच्या अडचणीला धावून येणाऱ्या देवेंद्र भुयार सारख्या शेतकरी संघटनेच्या  एका चांगल्या   कार्यकर्त्याला झोपडपट्टी दादा ठरवून तडीपार करणाऱ्या अमरावती पोलिसांनी आता पत्रकारांना तोच इशारा दिलाय..आमच्याशी पंगा घेऊ नका..आम्ही सर्वशक्तिमान आहोत..तुमच्या पत्रकारितेपेक्षा...जिल्ह्यातल्या नव्हे राज्यभरातील सत्य पुढं आणणाऱ्या पत्रकारांना हा इशारा आहे..

(प्रशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आपले सर्व ,मतभेद,मनभेद सोडून सर्व पत्रकारांनी एकत्र याव..कारण आज प्रशांत आहे उद्या आपल्यातला कुणी दुसरा असेल )

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक